renuka shahane – मला बरेच शिकायला मिळाले! | पुढारी

renuka shahane - मला बरेच शिकायला मिळाले!

अभिनेत्री रेणुका शहाणे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत. रेणुका लहान असतानाच तिचे आई-वडील विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांच्या स्वत:च्या घटस्फोटामुळे लग्नसंस्थेवरील त्यांचा विश्वास कमी झाला. माझे दुसरे लग्न झाले, त्यावेळी मी बरीच मोठी होते आणि त्यामुळे आव्हानांना योग्य पद्धतीने हाताळू शकले, असे तिने सांगितले. मला माझ्या पहिल्या लग्नापासून बरेच काही शिकायला मिळाले होते. त्यामुळे जेव्हा मी आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडले, तेव्हा लग्नाविषयीचे माझे विचार काही चांगले नव्हते. त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील चढउतारांना खूप चांगल्याप्रकारे हाताळू शकत होते कारण त्यावेळी मी वयानेही मोठी होते. दुसऱ्या लग्नावेळी माझे वय ३४-३५ होते. आणि भारतात लग्नासाठी हे वय खूप जास्त आहे, असे म्हणत ती हसली. आशुतोष राणासोबतच्या लग्नाबाबत ती म्हणाली होती, आमचे लग्न टिपिकल लग्न नव्हते.

आम्ही मंदिरात लग्न केले, त्यामुळे त्या लग्नात खूप लोक आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते; पण आम्ही आहेर स्वीकारला नव्हता. माझ्या सासरकडून माझे मोठे दीर यांनी माझ्या स्वागतासाठी एक पत्र लिहिले होते. त्यांनी दिलेले ते पत्र मी अजून जपून ठेवले आहे.

Back to top button