हेजल कीच- हे तर खास गिफ्ट | पुढारी

हेजल कीच- हे तर खास गिफ्ट

बॉलीवूड अभिनेत्री हेजल कीच हिचा नुकताच ३६ वा वाढदिवस साजरा झाला. टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंगने पत्नी हेजलला तिच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिले होते. युवीने दिलेल्या गिफ्टचा फोटो हेजलने सोशल मीडियावर शेअर केला. यात तिने खास कॅप्शनही दिले आहे. या फोटोमध्ये फुलांचा गुच्छ आणि एक फोटो कोलाज • दिसत आहे. या फोटोला हेजलने कॅप्शन दिलं, ‘थँक्यू हज्बंड ! माझ्यासाठी तू तयार केलेले हे सर्वात चांगले कार्ड आहे. फुलांसाठीही थँक्यू!’ युवीनेही हेजलच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. यात त्याने हेजलचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. मला वाटते, ‘ओरियनला तुझ्यापेक्षा जास्त चांगली आई मिळाली नसती. ओरी आणि त्याचे डॅडी तुझ्यावर खूप प्रेम करतात’, असे कॅप्शन युवीने दिले आहे.

Back to top button