माझे वयच चुका करण्याचे -सारा | पुढारी

माझे वयच चुका करण्याचे -सारा

बॉलीवूडमधील स्टारकिडस्पैकी अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. २०१८ मध्ये तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता नुकत्याच एका मुलाखतीत सारा तिच्या करिअरविषयी आणि चुकांविषयी मोकळेपणे बोलली. चुका करण्याचे माझे वयच आहे, त्यातून शिकायला मिळत असल्याचंही साराने मान्य केले आहे. एक अभिनेत्री म्हणून मला दररोज खूप काही शिकायला मिळते आणि हाच प्रवास माझ्या प्रगतीसाठी फायदेशीर, मी नेहमीच अशा गोष्टींमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. पण मीसुद्धा काही चुका केल्या आहेत, हे मान्य करते. मी असे काही चित्रपट केले आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण तरी चुका करण्याचे हे माझं वय आहे. पुन्हा जोमाने उभं राहण्यासाठी खाली पडणेही तितकंच महत्त्वाचे असते. चुका करणे हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे, हे मी शिकले आहे, असे सारा म्हणाली. केदारनाथनंतर ती रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात म्हणून झळकली. पहिले दोन चित्रपट यशस्वी ठरले. मात्र, इम्तियाज अलीचे ‘लव्ह आज ‘कुली नंबर- १’ हे चित्रपट चालले नाहीत.

Back to top button