Ayushmann Khurrana : टॅलेंट असायलाच हवे! | पुढारी

Ayushmann Khurrana : टॅलेंट असायलाच हवे!

पुढारी ऑनलाईन : आयुष्मान खुराना ( Ayushmann Khurrana ) हा बॉलीवूडमधील एक गुणी अभिनेता मानला जातो. त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले आहे. तो एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकतेच एका कार्यक्रमात बॉलीवूडमधील आपल्या प्रवासावर भाष्य केले.

तो तुमच्याकडे टॅलेंट असेल तर त्याचा चांगला वापर करा. दाक्षिणात्य चित्रपट मला खूप आवडतात. सध्याचा प्रेक्षक विभागला आहे. काही लोक चित्रपटगृहात चित्रपट पाहणे पसंत करतात तर काहींना ओटीटीवर चित्रपट पाहणे सोयीचे वाटते. यामुळे योग्य ओटीटी प्लॅटफॉर्म आणि योग्य कथानक लोकांसमोर आणायची गरज आहे. पूर्वीच्या काळात बॉलीवूडमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना किंमत नव्हती, त्यावेळी स्टारकिडस्ना सहज संधी मिळायची. आजही काही ठिकाणी स्टारकिडस्चाच विचार केला जातो, पण आता परिस्थिती बदलायला लागली आहे. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर बॉलीवूड तुमचे स्वागत करते. असे म्हटलं आहे.  ( Ayushmann Khurrana )

Back to top button