Akshaya Deodhar : अक्षयाचा लेहंगा लूक अन् चेहऱ्यावर दुपट्टा (video) | पुढारी

Akshaya Deodhar : अक्षयाचा लेहंगा लूक अन् चेहऱ्यावर दुपट्टा (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांच्या जोडीला कोण ओळखत नाही. राणादा म्हणजे, अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजे, मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांनी उत्तमरित्या भूमिका साकारल्या आहेत. मालिकेतील ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या सोबत असून काही दिवसापूर्वीच लग्न बंधनात अडकले आहेत. यानंतर दोघांनी नुकताच व्हॅलेंटाईन डे खास पद्धतीने साजरा केला आहे. यादरम्यान अक्षयाच्या ( Akshaya Deodhar ) एका स्टायलिश लूक चर्चेचा विषय बनला आहे.

अभिनेत्री अक्षया देवधरने ( Akshaya Deodhar ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षयाने व्हाईट रंगाचा घागरा- चोळी आणि दुपट्टा परिधान केल्याचे दिसतेय. खास करून यावेळी अक्षया बसलेली असून तिच्या चेहऱ्यावर दुपट्टा (घुंघट) वरून -खाली घालताना दिसत आहे. याशिवाय तिच्या लेहंग्यावरील भरजरी मोत्याची डिझाईन आणि तिचे मोहक लाजणे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘अपने चेहरे पर हंसता चेहरा रखता है, सच ना दिख जाए, वो नज़रों का पर्दा रखता है।✨’. असे लिहिले आहे. कानात झुमके, हातात अंगठी, केसांत गजरा, नाकाथ नथ, कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. हा व्हिडिओच्या बॅकग्रांऊडला ‘लफजो से जो था करे, खाली पण को जो भरे, कुछ तो था तेरे- मेरे गर्मीयॉ’ या हिंदी गाण्याचे बोल वाजत आहेत. हा व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

‘What pretty ness is this??!!! 😍😍❤️❤️❤️’, ‘Ky sundr distey😍’, ‘Beautiful 😍😍❤️’, ‘😍❤️❤️❤️kaddk🙌’, ‘Beauty with no words 👏🔥’, ‘🌹 AKSHAYA DDR YOU ARE LOOKING GORGEOUS AND GORGEOUS ❤️❤️’, ‘Super look, Ohhhhhooooo😍’, ‘Wahhhh…..👌’, ‘Pretty ❤️❤️’, ‘Beauty Qween😍’, ‘Kya baat hai😍🔥’, यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्ट सेक्शन बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला आतापर्यत १६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Back to top button