

पुढारी ऑनलाईन : उर्वशी रौतेलाने आपल्या २९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती 'बंजी जम्पिंग' करताना दिसत आहे. यावेळी ती पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसून आली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्संनी पुन्हा पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहची आठवण काढली आहे.
व्हिडीओ शेअर करत उर्वशी म्हणते, माझ्यासाठी बर्थडे विश काय असेल. आणखी एका जन्मदिवसपेक्षा चांगले गिफ्ट कोणतेच असू शकत नाही. मी माझे आयुष्य आणि त्यासमवेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा मी आनंद लुटत असते. मी माझ्या कुटुंबीयासह सर्व मित्रपरिवारांचे आणि चाहत्यांचे आभार मानते.
यावर युजर्सनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. नसीमने खासगीत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील असे एकाने तर मी तर नसीम आणि ऋषभच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची वाट पाहत असल्याचे दुसऱ्या एका युजर्सने कमेंट केली आहे.