Project K: प्रभास-दीपिकाचा महाशिवरात्रीला मोठा धमाका, यादिवशी येणार चित्रपट | पुढारी

Project K: प्रभास-दीपिकाचा महाशिवरात्रीला मोठा धमाका, यादिवशी येणार चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोणचा ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकू‍ळ घालत आहे. (Project K) आता अभिनेत्री दीपिकाने आपल्या फॅन्सना आणखी एक मोठा धमाका देण्यास तयार आहे. महाशिवरात्रीच्या औचित्याने आज दीपिकाने प्रभास आणि अमिताभ बच्चन स्टारर मच अवेटेड चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ ची रिलीज डेट आणि चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केलं आहे. (Project K)

या दिवशी होणार ‘प्रोजेक्ट के’ रिलीज

काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण आणि साऊथ चित्रपटाचे सुपरस्टार प्रभासने आपला ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ ची रिलीज डेटची घोषणा केलीय. दोन्ही कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरदेखील शेअर केले आहे. पोस्टरमध्ये एक मोठा हात दिसत आहे. त्याच्याकडे तीन बंदूकधारी लोक बंदूक घेऊन उभारलेले दिसत आहे. यासोबत पोस्टरवर रिलीज डेट लिहिलेली आहे. ‘प्रोजेक्ट के’ पुढील वर्षी १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

दोन भागात रिलीज होणार ‘प्रोजेक्ट के’

दीपिकाने पोस्टर शेअर करत लिहिले आहे, ‘प्रोजेक्ट के १२ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. हॅप्पी महाशिवरात्री.’

सायन्स फिक्शन चित्रपटातून दीपिका पादुकोण साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. चित्रपटात ‘बाहुबली’ फेम प्रभास आणि महनायक अमिताभ बच्चन दिसणार आहेत. ‘प्रोजेक्ट के’ एक तेलुगू सायन्स फिक्शन चित्रपट आहे. रिपोर्ट्सनुसार, नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. चित्रपट दोन भागात रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)

Back to top button