Mirzapur Actor Shahnawaz Pradhan : शाहनवाज प्रधान यांचे निधन | पुढारी

Mirzapur Actor Shahnawaz Pradhan : शाहनवाज प्रधान यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध वेब सीरीज मिर्झापूर फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले आहे. (Mirzapur Actor Shahnawaz Pradhan) ‘गुड्डू भैया’ म्हणजेच अभिनेते अली फजल यांच्या सासऱ्याची भूमिका शाहनवाज यांनी साकारली होती. त्यांच्या निधनाने बॉलीवूड टीव्ही सेलेब्स सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहत आहेत. (Mirzapur Actor Shahnawaz Pradhan)

त्यांना छातीत दुखत होतं. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अभिनेते राजेश तैलंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताची पुष्टी केलीय. अभिनेते तैलंग यांनी सोशल मीडियावर ट्विट करत लिहिले, शाहनवाज भाईला अखेरचा सलाम!!! खूप उत्तम कलाकार होता तुम्ही. मिर्झापूरच्या वेळी तुमच्यासोबत घालवलेला वेळ किती सुंदर होता, खरंच विश्वास होत नाही.

शाहनवाज या सीरीजमध्ये श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी) चे वडील परशुराम गुप्ताची भूमिका साकारली होती. शाहनवाज ८० च्या दशकातील टीव्ही मालिकांमधून लोकप्रिय झाले होते.

ते अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्येही दिसले होते. यामध्ये सैफ अली खान आणि कॅटरीना कैफच्या फँटम चित्रपटाचाही समावेश आहे. त्यांचा अलिकडेच मिड डे मील रिलीज झाला होता. ते मिर्झापूर ३ मध्येही दिसणार आहेत.

Back to top button