Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली तुर्कीतील मन हेलावणारी दृश्ये (Video)

priyanka chopra
priyanka chopra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) व्हॅलेंटाईन दिनाच्या पार्श्वभूमीवर मन हेलावून टाकणारे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही अश्रू आवरणार नाही. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर तुर्कीतील काही फोटो पोस्ट करून एक मोठी पोस्ट लिहिलीय. (Priyanka Chopra)

'आठवड्याभरानंतरही त्या वेदना आणि अडथळे सीरिया, (Turkey Earthquake) तुर्कीतील जनतेसमोर उभेच आहेत'. ती पुढे म्हणते -'एका आठवड्यानंतर, विनाशकारी भूकंपानंतर तुर्की आणि सीरियाच्या लोकांसाठी वेदना आणि त्रास सुरूच आहे. बचाव कार्य अथक आहे. काहींना आशा आहे की, आपली माणसे अजुनही जिवंत असतील. जिथे ३ महिन्यांच्या बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले होते. असे अनेक आहेत जे अजूनही अडकलेले आहेत, वाट पाहत आहेत आणि वाचण्याची आशा बाळगून आहेत, त्यांचे कुटूंब प्रार्थना करत आहेत. ते हृदयद्रावक आहे. आपण सर्वजण मदत करू शकतो. मला आशा आहे की तुम्ही जमेल त्या मार्गाने मदत कराल.'

या पोस्टनंतर प्रियांका किती बावूक आहे हे तर दिसून आले आहेच. शिवाय, अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिचे आभार मानले आहेत. पाठिंबा, समर्थन आणि मदतीसाठीची आवाहनाची पोस्ट टाकल्याबद्दल अनेक नेटकरी तिला धन्यवाद देत आहेत.

काही फोटोंमध्ये एक कुत्रा मुलीचा हात धरल्याचे दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये एका अन्नपदार्थाच्या पाकिटासाठी गर्दी जमलेली दिसते. एका व्हिडिओमध्ये एख व्यक्ती आपल्या नातेवाईकांना ढिगाऱ्याखाली शोधत आहे, अशी सर्व दृश्ये डोळे पाणावणारे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news