Shalva Kinjawdekar : येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्वचा साखरपुडा

 shalva kinjawdekar
shalva kinjawdekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्व किंजवडेकरचा (Shalva Kinjawdekar ) साखरपुडा पार पडला. काही मिनिटांपूर्वीच त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केलाय. त्याने या फोटोला Engaged! Now you're a part of our core family ? अशी कॅप्शन लिहिलीय. (Shalva Kinjawdekar )

येऊ कशी तशी मी नांदायला फेम मालिकेत ओम खानविलकर हा नवा चेहरा दाखवण्यात आला होता. ओमची भूमिका शाल्वने साकारली होती. एक श्रीमंत तरुण गरीब घरातील स्वीटूसारख्या तरुणीच्या प्रेमात पडतो. तिला प्रत्येक वेळी मदत करतो. त्यांच्यातील मैत्री घट्ट होत असताना त्याला प्रेम होतं आणि पुढे लग्न होतं, अशी मालिकेची स्टोरी होती.

कोण आहे शाल्व?

शाल्व किंजवडेकरचा जन्म पुण्यात झाला. शालेय शिक्षण अक्षरनंदन स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या 'Hunterrr' हिंदी चित्रपटात शाल्व झळकला. पुढे तो अभिनय क्षेत्रात आला. नंतर शाल्वने माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट' काम केले. पुढे २०१९ मध्ये डिजीटल विश्वात पदार्पण करत तो 'वन्स इन अ इअर' या वेब सीरीज दिसला. यामध्ये त्याची मुख्य भूमिका होती.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत शाल्वसोबत अन्विता फलटणकर, शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, निखील राऊत, उदय सालवी, दीप्ती समेळ या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news