अनन्या पांडे केंडल जेनर बनायचा प्रयत्न करू नकोस! | पुढारी

अनन्या पांडे केंडल जेनर बनायचा प्रयत्न करू नकोस!

अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकताच अनन्या हिने सोशल मीडियावर बिकिनीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अनन्या हिचा बोल्ड लूक दिसत आहे. मात्र, हे फोटो पाहून अनेकांनी तिला आता ट्रोल केले आहे. कुपोषणची शिकार झाली आहे ही, असे एकाने; तर दुसर्‍याने लिहिले की, केंडल जेनर बनण्याचा हिचा प्रयत्न दिसत आहे; परंतु तू कधीच तशी दिसू शकत नाहीस. अनन्याच्या या फोटोवर सुहाना खाननेही कमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्याचा ‘लाइगर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षादेखील होत्या. अनन्यासमवेत ‘लाइगर’ चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा हादेखील मुख्य भूमिकेत दिसला. अनन्या आणि देवरकोंडा यांची जोडी प्रेक्षकांना काही पसंतीस पडली नाही.

 

Back to top button