

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या आगामी 'शहजादा' (Shehzada) चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट पहिल्यांदा १० फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होता. मात्र, शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता निर्मात्यानी रिलीज डेटमध्ये बदल केला. आता १७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत कृती सेनॉनची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आले.
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)ने आगामी 'शहजादा (Shehzada)' चित्रपटाचे पहिले पोस्टर त्याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये कृती सेनॉन कार्तिकच्या डोक्यावर मुकूट परिधान करताना दिसल आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कार्तिने 'बात जब शहजादा की हो तो चर्चा नहीं करते…सीधा तिकीट बुक करते हैं ?'. असे लिहिले आहे. यावरून चाहत्यासाठी चित्रपटाचे ॲडव्हॉन्स बुकिंग सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
कार्तिक आर्यनचा शेहजादा मोठ्या पडद्यावर येत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट निर्मात्यानी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. यामुळे चित्रपटाचे ॲडव्हॉन्स बुकिंग ११ फेब्रुवारीपासूनच सुरू झाले आहे. कार्तिकचा 'शेहजादा' चित्रपट साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या 'आला वैकुंठपुरमलो' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय कार्तिकचे यु ट्युबवर 'कॅरेक्टर धिल्ली है' ( CharacterDheela2 ) हे गाणे रिलीज झाले आहे.
हेही वाचा :