Kiara Advani Sister : सिद्धार्थची मेव्हणी आहे पेशाने वकील; कियारालाही देते मात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara-Sidharth Wedding) अनेक वर्षाच्या डेटिंगनंतर अखेर लग्न बंधनात अडकले. या विवाहाला बॉलिवूडचे दिग्गज स्टार्ससोबत नातेवाईक आणि मित्रमंडळींनी आवर्जून उपस्थिती लावली. हा शाही विवाह राजस्थानमधील जेसलमेरच्या सुर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला आहे. यावेळी कियारा नववधूच्या आणि सिद्धार्थ नववरांच्या वेशभूषेत एकदम ग्लॅमरस दिसले आहेत. मात्र, कियाची बहिण ( Kiara Advani Sister ) आणि सिद्धार्थची मेव्हणी इशिता आडवाणीदेखील सुंदरतेच्या बाबतीत काही कमी नाही. लग्नात इशिताच्या ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
कियारा आडवाणीच्या ( Kiara Advani Sister ) लग्नात खास करून तिच्या बहिण इशिताच्या लूकची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. कियाराची बहिण इशिता पेशाने वकील असून ती सौदर्यांची बाबतीत कमी नाही. इशिताने मुंबईतील गव्हर्मेन्ट कॉलेजमधून ‘लॉ’ ची पदवी संपादन केली आहे. गेल्या वर्षी ५ मार्चला २०२२ रोजी इशिताचे लग्न कर्म विवान याच्यासोबत झालं आहे. कर्म विवान हे देखील पेशाने वकील आहेत.
कियारा आणि इशिताचे दोघीचे बॉन्डिंगदेखील खूपच चांगले आहे. अनेक बॉचलर पार्टीत कियारासोबत इशिताचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना पाहायला मिळालाय. सोशल मीडियावर इशिताच्या एकापेक्षा एक हॉट फोटोचा तडका पाहायला मिळतोय. कियारासोबत इशितादेखील फोटोत सुंदर आणि हॉट दिसतेय. याच दरम्यान कियाराचा पती सिद्धार्थदेखील मेव्हणीकडे एकटक पाहातच राहिला.
हेही वाचा :
- Siddharth-Kiara Wedding : सिद्धार्थ-कियारा अडकले विवाहबंधनात (Video)
- Sidharth-Kiara : ३ दिवसांत खर्च केले इतके कोटी, ‘या’ कपलनी लग्नात पाण्यासारखा ओतला पैसा
- Kiara-Sidharth wedding update : कियारा-सिद्धार्थचे ६ ला नव्हे तर ‘या’ तारखेला लग्न होणार
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram