Rakhi Sawant: ‘लग्नाआधी माहिती असतं तर…’ राखी झाली बेशुद्ध

rakhi sawant
rakhi sawant
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सावंत आण तिचा पती आदिल दुरानी यांच्यामध्ये काही ठिक नाहीये. राखीने (Rakhi Sawant) पतीवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपंनंर पोलिसांनी आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंचर प्रकरण आणखी चिघळले आहे. रोज एकानंतर एक नवे खुलासे होत आहेत. राखीने आदिलवर मारहाणीचा आरोप केला असून त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सचा खुलासा केला आहे. तिने आदिल विरोधात FIR देखील दाखल केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांच्या मध्ये राखी मीडियाशी बोलत होती, त्यावेळी अचानक राखी बेशुद्ध झाली. (Rakhi Sawant)

'लग्नाआधी माहिती असतं तर…'

राखीला यावेळी विचारण्यात आले की, आदिलच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला का? यावर राखी म्हणाली, हो. आई तर आई असते. आईसाठी माझं मन रडतं. पण, मी त्यांना आदिलविरोधात कधीच बोलले नाही. उलट मी म्हणाले, तुमच्यासाठी मी नेहमी तुमची सून म्हणून उभी राहिन, अर्ध्या रात्री बोलवा…येईन. परंतु, आदिलविषयी काही बोलू नका. आंटीला विचारा की, सात महिन्यांमध्ये मी तिच्याकडे तक्रार केलीय का की आदिल मला मारतो. मला टॉर्चर करतो. आंटीने मला सांगितलं की, तुझ्या जागी मी असते तर कधीच त्याला सोडून दिलं असतं. तू त्याला सोडून दे. कारण, मारहाणीचे सर्व व्हिडिओ प्रूफ म्हणून मी त्याला पाठवले होते. त्यांनी सांगितलं की, राखी आदिलला आताच्या आता सोड. कारण, मी तुझ्या जागी असते तर … इतके अफेअर्स..तर मी सोडलं असतं. पण, मी म्हणाले की, तुम्ही त्याला समजू सांगा. त्यांनी खूप समजावलं. परंतु, मुंबई नगरिया चकाचौंध. स्टार बनायचंय. आता काय बोलू मी. त्याचे इतके सारे क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत. मैसूर, बंगळुरु. लग्नाच्या आधी मला हे माहिती असतं तर कदाचित हा दिवस आला नसता.'

बेशुद्ध झाली राखी

राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राखीला आदिलबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावेळी राखी अचानक बेशुद्ध झाली. तिला लोक सावरताना दिसत आहेत. तिला गाडीमध्ये बसवले जाते. काही लोकांना तिच्याबद्दल हळहळ वाटत आहे तर काहींना ती ड्रामा करताना दिसतेय. कारण, तिच्या हातातून मोबाईल सुटलेला दिसत नव्हता.

video-viral bhayani insta वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news