Sidharth-Kiara: एकीकडे रिसेप्शन, दुसरीकडे हनीमूनचा प्लॅन.. | पुढारी

Sidharth-Kiara: एकीकडे रिसेप्शन, दुसरीकडे हनीमूनचा प्लॅन..

पुढारी ऑनलाईन डेस्क : ९ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या तमाम नातेवाईक, मित्रमंडळी आणि अन्य दिग्गजांना रिसेप्शन पार्टी देईल. रिसेप्शननंतर १० फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियारा दिल्ली ते मुंबईसाठी (Sidharth-Kiara) रवाना होतील. त्यानंतर १२ फेब्रुवारीला मुंबईत तमाम लोकांसाठी एक रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं जाईल. (Sidharth-Kiara)

सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होतील सिड-कियारा

सिद्धार्थ-कियारा आज सायंकाळी जवळपास ५.४५ वाजता दिल्लीतील प्रायव्हेट टर्मिनलवर पोहोचतील. येथे मीडियासाठी फोटो-ऑपदेखील होईल.

आज सायंकाळी नववधूचं स्वागत

आज सायंकाळी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी सायंकाळी चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीसाठी रवाना होणार आहे. येथे सिद्धार्थचं घर आहे. येथे कियाराचा गृह-प्रवेश होईल.

आलिया भट्टने कपलला दिल्या शुभेच्छा

आलिया भट्टने सिद्धार्थ-कियाराचा फोटो आपल्या इन्स्टावर शेअर करत लिहिलं की, “तुमचे अभिनंदन.”

खास आहे कियाराचे कलीरे

मृणालिनी चंद्राद्वारा कियाराचे कलीरे डिझाईन केले गेले होते. यामध्ये खास पर्सनल टच देण्यात आलं आहे. कियाराच्या कलीरे अगदी जवळून पाहिले तर यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा पाळीव कुत्रा ऑस्करच्या चेहऱ्याची झलक पाहायला मिळते. ऑस्करचा मागील वर्षी मृत्यू झाला होता.

सिद्धार्थ- कियाराचे वेडिंग कार्ड व्हायरल

कियारा-सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या लग्नाचे वृत्त शेअर केले आहे. फोटो शेअर करत सिद्धार्थ- कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलं की – ‘आता आमची परमनेंट बुकिंग झाली आहे…आम्हाला आमच्या पुढील प्रवासासाठी तुमचा आशीर्वाद आणि प्रेम हवं आहे.’

हनीमूनसाठी येथे जाणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि कियारा हनीमूनसाठी रोम जाऊ शकतात. कारण, हे दोघांचे फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. या लोकेशनचा समावेश कियाराने आपल्या कलीरेच्या डिझाईनमध्ये केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Back to top button