नगर : डिजिटल डाऊनलोडमध्ये जिल्हा विभागात अव्वल | पुढारी

नगर : डिजिटल डाऊनलोडमध्ये जिल्हा विभागात अव्वल

नगर : पुढारी वृत्तसेवा : शेतकरी व नागरिकांसाठी सातबारा महत्त्वाचा आहे. याशिवाय आठ अ, फेरफार या महसुली अभिलेखांची मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षांत अभिलेखे ऑनलाईन डिजिटल घेण्यात अहमदनगर जिल्हा नाशिक विभागात आघाडीवर आहे. आतापर्यंत 66 लाख 82 हजार 654 महसुली अभिलेखे ऑनलाईन डाऊनलोड करण्यात आले. यातून 10 कोटी 2 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. बँकांचे कर्ज काढणे, शासकीय व खासगी कामांसाठी मालमत्तेचा पुरावा म्हणून सातबारा आवश्यक आहे. सातबारा उतार्‍यासाठी तलाठी कार्यालयात फेरफटके मारावे लागत आहे. तोही वेळेत मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे ऑनलाईन सातबारा तयार करण्याचे काम दहा वषांंपूर्वी हाती घेतले. गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाईन सातबारा उतारे उपलब्ध होत आहेत. याशिवाय आठ अ व फेरफार उतारे देखील ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत.

महसूल विभागाच्या महाभूमी पोर्टलव्दारे गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील नागरिकांनी 35 लाख 60 हजार 447 सातबारा, 21 लाख 47 हजार आठ अ आणि 9 लाख 74 हजार 476 फेरफार असे एकूण 66 लाख 82 हजार 654 डिजिटल स्वाक्षरीयुक्त महसुली अभिलेख काढण्यात आले. 15 रुपये प्रमाणे सातबारा व इतर अभिलेखाची एक ऑनलाईन प्रत उपलब्ध होते. त्यानुसार शासनाच्या तिजोरीत 10 कोटी 2 लाख 39 हजार 810 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये सातबारा उतार्‍यातून मिळालेल्या 5 कोटी 34 लाख रुपयांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय डाऊनलोड अभिलेख
अहमदनगर : 6682654, नाशिक : 6606444, जळगाव :5184723,धुळे : 2191202, नंदुरबार : 1035512

Back to top button