‘कांतारा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर; चित्रपटाचा येतोय ‘प्रीक्वेल’

‘कांतारा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर; चित्रपटाचा येतोय ‘प्रीक्वेल’

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या 'कांतारा' ( Kantara ) चित्रपटाने १०० दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने केवळ १६ कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर भरघोष अशी ४५० कोटींची कमाई केली. यामुळे कांतारा हा चित्रपट २०२२ चा ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपटाच्या यशामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. याच दरम्यान चाहत्यांनी चित्रपटाच्या सिक्वेल येणार असल्याची अफवाही सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, याबाबतची अधिकृत्त माहिती समोर आली नव्हती. आता कातांराच्या चाहत्यासाठी निर्मात्यांनी एक खुशखबर आणली आहे.

अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या 'कांतारा' चित्रपट गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज झाला आहे. रिलीजनंतर चित्रपटाने बॉक्स आफिसवर भरघोष कमाई करत आता १०० दिवसांचा टप्पा दिवस पूर्ण केला आहे. या चित्रपटाने ४५० कोटींची कमाई केली आहे. याच दरम्यान उल्लेखनीय प्रवासानिमित्ताने चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक याच्यांसह टीमने हा दिवस साजरा केला. या खास प्रसंगी Kantara चित्रपटाचे लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी चित्रपटाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे.

Kantara : भाग १ ( प्रीक्वेल) पुढील वर्षी येणार

या कार्यक्रमात ऋषभ शेट्टी म्हणाले की, 'आम्ही खूपच आनंदी आणि उत्साही आहोत. चाहत्याचे आभार मानतो ज्यांनी 'कांतारा' वर इतकं प्रेम केलं आणि १०० दिवसांचा टप्पा पार केला.  देवाच्या आशीर्वादाने, चित्रपटाने यशस्वीरित्या १०० दिवस पूर्ण केले आहेत. मला 'कांतारा' चा उत्सव साजरा करायला आवडला. तुम्ही पाहिलेला हा चित्रपटाचा भाग २ आहे.  याचा भाग १ पुढच्या वर्षी येणार आहे. मी कांताराचं शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात आली. कारण यात 'कांतारा' च्या इतिहासात अधिक सखोलता आहे. त्यामुळे इतिहासात जावून लेखन करण्याचे सुचले आहे. आम्ही सध्या यावर अधिक काम करत आहोत. संशोधन अद्याप सुरू असल्याने चित्रपटाच्या तपशीलाबद्दल काहीही माहिती उघड करणे शक्य नाही.' असेही ते म्हणाले.

निर्माते विजय किरगांडूर म्हणाले की, 'कांतारा'च्या चाहत्यांमुळे चित्रपट पुढे सुरु ठेवण्याची आम्हाला उर्जा मिळाली. त्यामुळे आम्ही त्याच्या प्रीक्वेल ( भाग १ )  आणण्याच्या विचारात आहोत. याच दरम्यान चाहत्याचीदेखील यात भर पडत गेली आहे. चित्रपटाने आता १०० दिवस पूर्ण केल्यामुळे उत्कंठा वाढली आहे. ऋषभ शेट्टी आणि आमची टीम कथेवर कठोर परिश्रम घेत आहे. कारण 'कांतारा' च्या इतिहासातील कथेत अनेक गोष्टीचा उलगडा होणार आहे. या चित्रपटापेक्षा अजून बरेच काही आहे आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्नात आहोत. 'कांतारा' चा सिक्वेल पूर्वीपेक्षा मोठा आणि भव्य असणार आहे असेही ते म्हणाले.  'कांतारा' च्या प्रीक्वलची निर्मिती विजय किरगंडूर आणि चालुवे गौडा यांनी होंबळे फिल्म्स अंतर्गत केली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी हे मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news