Kiara- Sidharth : आली लग्न घडी समीप; कियारा-सिद्धार्थ लवकरच होणार विवाहबद्ध

पुढारा ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा अनेक वर्षाच्या डेटिंगनंतर अखेर आज लग्न बंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा ( Kiara- Sidharth ) राजस्थानमधील जेसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात पार पडत आहे. या विवाहाला अनेक बॉलिवूड दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. यावेळी या शाही सोहळ्यातील काही स्टार्सचे, हळदी, संगीत आणि पॅलेसच्या सजावटीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या विवाहाला करण जोहर, शाहिद कपूर, मनीष मल्होत्रा, मीरा राजपूत, जूही चावला, ईशा अबांनी याच्यासोबत अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी सहभागी झाले आहेत. याआधी कियारा-सिद्धार्थ याचे लग्न ६ फेब्रुवारीला होणार अशी सर्वत्र चर्चा पसरली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न ६ नव्हे तर ७ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास होणार आहे. अशी माहिती मिळत आहे. तर या शाही विवाहाला१० देशांतील वेगवेगळ्या १०० हून अधिक खाद्य पदार्थाची ऑर्डर दिली आहे. यात चीनी, अमेरिका, दक्षिण भारत, मेक्सिकन, राजस्थानी, पंजाबी, गुजराती इत्यादी देशांचा समावेश आहे.
विवाहानंतर कियारा- सिद्धार्थ ८ फेब्रवारीला दिल्ली रवाना होणार असून तिथेच एका खास रिशेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर हे कपल १० फेब्रवारीला मुंबईला परतणार आहे. ( Kiara- Sidharth )
हेही वाचा :
- Kiara-Sidharth wedding update : कियारा-सिद्धार्थचे ६ ला नव्हे तर ‘या’ तारखेला लग्न होणार
- Kiara-Sidharth Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या विवाहासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी जैसलमेरमध्ये दाखल (Video)
- kiara-sidharth : सिद्धार्थ मल्होत्राची नवरी होणार कियारा? करण जोहरने दिला इशारा
(video, photo : viralbhayani instgram वरून साभार)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram