<---- Script to Prevent Copy Paste-----> <--- Code End----->

Kiara Advani Wedding: कियारा जैसलमेरसाठी रवाना, विमानतळावरून फोटो व्हायरल

Kiara Advani Wedding: कियारा जैसलमेरसाठी रवाना, विमानतळावरून फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ६ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी कियारा जैसलमेरला रवाना झाली. यावेळी ती विमानतळाबाहेर आपल्या कुटुंबीयांसोबत स्पॉट झाली. राजस्थानमधील जैसलमेर येथे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा सात फेरे घेणार आहेत. फुल ऑन तयारी सुरु असून सूर्यगढ पॅलेस सजवण्यात आला आहे. मेहंदी डिझायनर वीना नागडादेखील पोहोचली आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाला साऊथ अभिनेता राम चरण सहभागी होणार आहे.

रिपोर्टनुसार, कियारा आडवाणीच्या लग्नात साऊथ अभिनेता राम चरण उपस्थित राहणार आहे. दोघांनी एकत्र चित्रपट 'RC 15' मध्ये काम केलं आहे. याशिवाय, शाहिद कपूर -मीरा राजपूत देखील लग्नात असतील. कियाराने राम चरणला लग्नाचे आमंत्रण दिले आहे. कियारा राम चरणला आपला जवळचा मित्र मानते.

लग्नात करण जोहर, अश्विनी यार्डी देखील येण्याची शक्यता आहे. याशिवाय वरुण धवन, नताशा दलाल यांनादेखील आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मेहंदी सेरेमनी ५ फेब्रुवारीला तर ६ फेब्रुवारीला दोघे सात फेरे घेतील, अशी माहिती समोर आलीय.

कियारा -सिद्धार्थ एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत आहेत.

video- bhayani twitterवरून साभार

आतून सुंदर दिसतो सूर्यगढ पॅलेस
कियारा -सिद्धार्थ राजस्थानमधील जैसलमेर येथे सात फेरे घेतील. दोघांनी आपल्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेस निवडलं आहे. या लक्झरी प्रॉपर्टीमध्ये सर्वात महाग थार रूम आहे. या रुमचा एका रात्रीचे भाडे जवळपास एक लाख ३० हजार रुपये आहे. यासिवाय, अनेक सुईट्स आहेत, त्याचे भाडे २४ हजार पासून सुरू आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसाठी जवळपास ८४ रूम बुक आहेत. या कार्यक्रमात कुटुंबातील आणि जवळच मित्र उपस्थित राहतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news