Neha Dhupia: 'बॉलिवूडमध्ये एक तर S*X विकतं किंवा शाहरुख खान! ... | पुढारी

Neha Dhupia: 'बॉलिवूडमध्ये एक तर S*X विकतं किंवा शाहरुख खान! ...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर एकानंतर एक रेकॉर्ड करत आहे. हे वास्तवात शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) फॅन्ससाठी एक सेलिब्रेशन आहे. जेव्हा इंडस्ट्रीतील कलाकारांनी ‘पठान’च्या यशासाठी कौतुक केलं, तेव्हा बॉलिवूडचा बादशहा खराखुरा किंग खान ठरल्याचे सिद्ध झाले. आता अभिनेत्री नेहा धूपियाचे एक जुने स्टेटमेंटदेखील चर्चेत आले आहे. २०१४ मध्ये नेहाचा (Neha Dhupia) बोल्ड चित्रपट ‘जूली’ रिलीज झाला होता. त्यावेळी तिने केलेले एक जुने स्टेटमेंट पुन्हा चर्चेत आले आहे. तिने दावा केला होता की, ‘एक तर सेक्स विकतं किंवा शाहरुख खान’. तिच्या या स्टेटमेंटनंतर खूप चर्चा झाली होती. (neha dhupia)

नेहा धूपियाने ‘पठानच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन’वर ट्विटरवर एक कमेंटचे उत्तर देताना मजेशीर ट्विट केलं. युजरने नेहा धूपियाला टॅग केलं आणि लिहिलं, ‘दोन दशकांपूर्वी @NehaDupia ने एक स्टेटमेंट दिलं होतं. ‘एक तर सेक्स विकतं किंवा #ShahRukhKhan’ आणि हे आजदेखील सत्य आहे!’

नेहाने यावर लिहिलं, ‘पण, माझं म्हणणं खरं वाटतं. हे अभिनेत्याचं करिअर नाही तर राजाचे शासन आहे! #KingKhan @iamsrk’

नेहा धूपियाने हे स्टेटमेंट २००४ मध्ये केलं होतं, जेव्हा प्रियांशु चॅटर्जी आणि संजय कपूरचा चित्रपट ‘जूली’ रिलीज झाला होता. तिने चित्रपटामध्ये एका सेक्स-वर्करची भूमिका साकारली होती. तिने एका मुलाखतीतमध्ये म्हटलं होतं की-‘जूलीचे लव्ह-मेकिंग सीन्स आणि शॉट्स …. एक्सपोज करतात…मी सेक्स सिंबल टॅगने प्रभावित नाही. जर लोक म्हणतात की, मी जूलीच्या रूपात एक्सपोज करून मल्लिका शेरावत आणि बिपाशा बसुला मागे टाकले आहे तर मला काही फरक पडत नाही. आजच्या काळात एकतर सेक्स विकतं किंवा शाहरुख खान. म्हणून पुढील पाच चित्रपटांमध्ये नला सेक्स प्रॉप बनणे आवडेल.’

नेहाने ‘पठान’चे केलं कौतुक

नेहाने ‘पठान’ (Pathaan) पाहिल्यानंतर समीक्षा केली होती. तिने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं होतं- ‘iamsrk आमच्याकडे जे तुमच्यासाठी प्रेम आहे, ते व्यक्त करणं खूप कठीण आहे @Deepikapadukone#जॉनअब्राहम तू खराब लूकला इतकं चांगलं बनवलंस @BeingSalmanKhan आम्ही इतिहासातील सर्वात चांगला कॅमियो पाहण्यासाठी चित्रपटगृहात परत जाऊ #पठान !!!

Back to top button