kailash kher
Latest
Kailash Kher : हम्पी उत्सवात कन्नड गाण्याची मागणी करत खेर यांच्यावर फेकली बाटली
पुढारी ऑनलाईन डेस्क : हम्पी उत्सवात परफॉर्म करताना प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांच्यावर कन्नड गीतांची मागमी करत बाटलीने हल्ला करण्यात आला. या प्रकरमी दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी केर यांच्यावर पाण्याची बाटली फेकली होती. (Kailash Kher)
हा प्रकार रविवार सायंकाळी घडला. प्रेक्षक गॅलरीतून बाटली फेकल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले. तीन दिवसीय हम्पी उत्सव २७ जानेवारीपासून सुरु झाला आहे. शुक्रवार सायंकाळी कर्नाकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या उत्सवाचे उद्घाटन केले होते.

