गेल्या वर्षी पासून बॉलीवूडमध्ये बॉयकॉट ट्रेंड खूप चर्चेत आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला शाहरूख खानच्या 'पठाण'लादेखील बॉयकॉट करण्याची मागणी केली गेली. मात्र, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. 2022 वर्षात बॉलीवूडचे चित्रपट फारसे चालले नाहीत. बॉयकॉट बॉलीवूड, वेगवेगळे वाद यावरच प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी भाष्य केले आहे. नुकताच त्यांचा 'इंडिया लॉकडाऊन' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून ते कोरोना काळातील टाळेबंदीवर भाष्य केले आहे. ते एका मुलाखतीत म्हणाले, 2022 हे वर्ष बॉलीवूडसाठी खूप वाईट होते. मला असे वाटते हा एक टप्पा आहे आणि हा टप्पा 4 ते 5 वर्षांनी येत असतो. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर हा टप्पा आला आहे असे वाटते. कोरोनानंतर प्रेक्षक ओटीटीकडे वळले आहेत. सध्या जगभरातील कंटेंट ओटीटीवर पाहायला मिळतो.