Pathaan Movie : उफ्फ… अब तो पुरे बर्बाद हो गए! 🥰; ‘पठान’ विषयीची हेमांगी पोस्ट चर्चेत | पुढारी

Pathaan Movie : उफ्फ... अब तो पुरे बर्बाद हो गए! 🥰; 'पठान' विषयीची हेमांगी पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्याने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड आणि ब्युटिफुल हेमांगी कवी तिने नवनवीन फोटो आणि व्हिडिओदेखील शेअर करत असते. शाहरूख खानचा ‘पठान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटातून शाहरूख चार वर्षानंतर कमबॅक करत असल्याने चाहत्यांसह अनेक कलाकार त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहेत. याच दरम्यान हेमांगीने पठानविषयी ( Pathaan Movie) खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने नुकतेच शाहरूखच्या पठानविषयी ( Pathaan Movie ) भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ‘तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला. वगैरे- वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच तोंड बंद करा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए. पण, आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहिला नाही. 😝 असो.’ असे तिने लिहिले आहे.

‘मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतः ला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू शकतो! स्वतः च्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बर्बाद हो गए! 🥰.पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी… झूमे जो पठान मेरी जान, महफ़िल ही लूट जाए! You were, You are & You will be forever…Baazigar! @iamsrk ❤️❤️❤️’. असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

शाहरूखचा पठान सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यादरम्यान हेमांगीने शाहरूखचे भरभरून कौतुक केलं आहे. हेमांगीने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एका तासापूर्वीच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हेमांगी डोळ्यातील पाणी पुसताना दिसतेय. तर त्याच्या बॅकग्राऊंडला ‘मुझे तुम नजर से, गीरा तो रहे हो, मुझे तुम कभीभी भूला ना सकोंगे’. या हिदी गाण्याच्या बोल वाजत आहेत. यावेळी तिने गुलाबी कलरचा चुडीदार परिधान केला आहे.

‘दर्द ए दिल ❤️’, ‘खूप छान आहे की 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 तुझे डोळ्यातील भाव मनाला भिडणारे आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️ तुला हेमू नावांनी बोले तर चालेल का????, भारीच अभिनय ❤️❤️’, ‘🔥🔥 अप्रतिम खुप खुप सुंदर’, ‘Cute and lovely’, ‘Nice’, ‘Kon hai wo tumhe nazar se gira raha hai 😥😥😭😭😡😡Love you always @hemangiikavi ❤️❤️you are super cute & your expressions are simply amazing 🥰🥰 have a great weekend ❤️❤️’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचा ; 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

Back to top button