Urfi Javed : मला शाहरूखची दुसरी पत्नी बनवा ! | पुढारी

Urfi Javed : मला शाहरूखची दुसरी पत्नी बनवा !

पुढारी ऑनलाईन : शाहरूख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. एकीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे उर्फी जावेदने ( Urfi Javed ) शाहरूखबद्दल वक्तव्य केले आहे. यावेळी तिने ‘पठाण’ चित्रपटाबद्दलही वक्तव्य केले आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत ती पापाराझींना फोटोसाठी पोज देत असल्याचे दिसत आहे. तिने शाहरूख खानचे कौतुक केले. ती म्हणाली, मी बोलून काय होणार आहे? त्यावर पापराझी म्हणाला, नाही असे कसे? शाहरूख बघेल नक्कीच! त्यानंतर उर्फी म्हणाली, मी शाहरूखवर खूप प्रेम करते. मला शाहरूखची दुसरी पत्नी बनवा. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( Urfi Javed )

Back to top button