Shruti Haasan- Naga : श्रुतीचे नागा चैतन्यवर जडले होते प्रेम | पुढारी

Shruti Haasan- Naga : श्रुतीचे नागा चैतन्यवर जडले होते प्रेम

पुढारी ऑनलाईन : श्रुती हसनने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत दमदार अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे; पण अभिनय कारकिर्दीपेक्षा श्रुती खासगी आयुष्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली. श्रुतीचे नाव बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर ते सामंथा रुथ प्रभूचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यपर्यंत जोडले गेले होते. ( Shruti Haasan- Naga )

श्रुतीने रणबीरबरोबर अफेअरच्या चर्चा या अफवा असल्याचे म्हटले होते; पण नागा चैतन्य आणि श्रुतीच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. श्रुती सध्या शांतनूला डेट करत आहे. २०१३ मध्ये नागा आणि श्रुती डेट करत होते. श्रुती नागा चैतन्यच्या प्रेमात आखंड बुडाली होती. एवढेच नाही, तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या; पण काही काळातच ते वेगळे झाले. श्रुती आणि नागा चैतन्यचे नाते तुटण्याचे कारण श्रुतीची बहीण अक्षरा असल्याचे बोलले गेले होते. ( Shruti Haasan- Naga )

Back to top button