Janhvi Kapoor : जान्हवीच्या साडीत बोल्ड अदा, ही तर सत्यम शिवम.. | पुढारी

Janhvi Kapoor : जान्हवीच्या साडीत बोल्ड अदा, ही तर सत्यम शिवम..

पुढारी ऑनलाईन डेस्क : जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) इन्स्टाग्रामवर आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज शेअर केले आहेत, ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसतेय. तिने नाकामध्ये एक मोठी नथ घातली आहे. मोकळे केस आणि स्मोकी आईज मेकअप केलाय. ब्राऊन कलरच्या साडीत ती बोल्ड दिसतेय. तिने लाईट लिपस्टिक लावलीय. प्रत्येक फोटोंमध्ये ती बोल्ड अंदाजात पोझ देताना दिसतेय. (Janhvi Kapoor)

हे सुंदर फोटोज जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने विदाऊट ब्लाऊज साडी नेसली आहे. ती सिल्क ब्राऊनची साडी दिसत असून ती कॅमेरामध्ये हॉट पोज देताना दिसतेय.

जान्हवीने हे फोटो एका दिव्याच्या इमोजीसोबत शेअर केले आहेत. तिचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. या फोटोंना ४८ मिनिटांमध्ये २३ हजार २०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर फोटोंना दोन हजारांहून अधिक कमेंट केले आहेत. अनेक लोकांनी फोटोंवर ‘स्टनिंग’, ‘ब्युटीफुल’, ‘हॉट’, ‘नाईस’, ‘तू खूप सुंदर दिसत आहेस’, असे कमेंट्स केले आहेत. एकाने लिहिलं आहे, ‘यार इथे इतकी गर्मी का आहे, कोणी एसी सुरु करा.’

जान्हवीची व्हाईट साडीही चर्चेत

जान्हवी कपूरने याआधी व्हाईट साडीमध्ये आपले फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये ती तलावात उभे राहून पोझ देताना दिसते. ती या लूकमध्ये खूप हॉट दिसतेय. जान्हवी कपूर मिली चित्रपटात दिसली होती. याशिवाय अन्य कलाकारांच्या मुख्य भूमिकाही त्यामध्ये होती. जान्हवीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Back to top button