Masaba Gupta : नीना गुप्ताची लेक मसाबा अडकली दुसऱ्यांदा लग्नबंधनात (photo) | पुढारी

Masaba Gupta : नीना गुप्ताची लेक मसाबा अडकली दुसऱ्यांदा लग्नबंधनात (photo)

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बधाई हो’ फेम अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta)ची लेक मसाबा गुप्ता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकली. गेल्या काही दिवपांसून मसाबा ( Masaba Gupta ) बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा याला डेट करत होती. यानंतरच दोघेजण आज रितसर विवाह केला आहे. या विवाहाचे काही फोटो मसाबाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या विवाहाला काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी उपस्थिती लावली होती. यामुळे मसाबाने गुपचूप पद्धतीने लग्न केलं आहे काय? असे बोलले जात आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ( Masaba Gupta ) ने तिच्या इंन्स्टाग्रामवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी मसाबाने पिंक- ग्रीन कलरच्या लेहेग्यांत तर सत्यदीप पिंक रंगाच्या शेरवानीत एकदम हॅडसम दिसला. नववधू -वरांच्या वेशभूषेत दोघेही ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहेत. यातील एका फोटोत दोन्हीकडील कुंटूबिय आनंदीत आणि उत्साहित होते.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘Married my ocean of calm,this morning.Here’s to many many lifetimes of love,peace,stability & most importantly laughter. And thanks for letting me pick the caption – this is gonna be great! 😄❤️’, ‘For the first time ever – My whole life came together. This is us. My beautiful blended family 💛Everything from here on is just bonus.’ असे लिहिले आहे. यावरून मोजकेच नातेवाईकांच्या उपस्थितीत मसाबाचा विवाह पार पडल्याचे समजते. तसेच खास करून, या विवाहाला मसाबाचे वडील प्रसिद्ध क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनी हजेरी लावली होती.

मसाबा गुप्ता ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. याशिवाय ती नेटफ्लिक्स शो ‘मसाबा मसाबा’ मध्ये दिसली होती. मसाबाचे सत्यदीप मिश्रासोबत हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने २०१५ मध्ये मधु मंटेनाशी लग्न केले होते. मात्र, काही कारणास्तव ४ वर्षानंतर तिचा घटस्फोट झाला होता.

अभिनेता सत्यदीप मिश्राचेही हे दुसरे लग्न आहे. याआधी त्याने २००९ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत लग्न केले होते. त्याचाही किरकोळ कारणाने घटस्फोट झाला होता. ‘मसाबा मसाबा’ च्या शूटिंगदरम्यान दोघांची पहिली भेट झाली आणि दोघेजण एकमेंकाने डेट करू लागले. शेवटी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

Back to top button