पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटनंतर आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळविला आहे. महेंद्रसिंग धोनी आगामी 'एलजीएम: लेट्स गेट मॅरीड' ( LGM ) हा तमिळ चित्रपट घेवून येत आहे. हा चित्रपट धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रोडक्शन हाऊस बॅनरखाली बनवण्यात येणार असून पहिल्यांदा धोनीची पत्नी साक्षी सिंह हिने चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.
महेंद्रसिंग धोनीने नुकतेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून आगामी 'एलजीएम: लेट्स गेट मॅरीड' चित्रपटाची घोषणा केली आहे. LGM चित्रपटाचा एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये झाडाची पाने दाखविली असून नंतर एक बस वेड्यावाकड्या वळणावर धावताना दिसतेय. याच दरम्यान काही पक्षीही दिसत असून मध्येच 'एलजीएम' ही इंग्रजीत अक्षरे लिहिली आहेत. याशिवाय शेवटी ही अक्षरे आणि बस आडव्या आठ आकड्यात गुतंलेली दिसतात.
पोस्टरमध्ये 'We're super excited to share, Dhoni Entertainment's first production titled #LGM – #LetsGetMarried! ,Title look motion poster out now!'. असे लिहिले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पोस्टरला इन्स्टाग्रामवर तीन तासांत १ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि १ लाख ५३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
'एलजीएम' चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमनी यांनी केले आहे, तर धोनीची पत्नी साक्षी सिंग या चित्रपटाची निर्माती आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेता हरीश कश्यप आणि इवाना यांच्यासोबत नादिया आणि योगी बाबू यांच्याही भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा :