Pathaan Full Shows: कोटामधील थिएटरमध्ये सीट्स न मिळाल्याने तोडफोड | पुढारी

Pathaan Full Shows: कोटामधील थिएटरमध्ये सीट्स न मिळाल्याने तोडफोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा चित्रपट पठानची क्रेज सगळीकडे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नवा रेकॉर्ड बनवत आहे.(Pathaan Full Shows) सर्व थिएटर हाऊसफुल आहेत. काही ठिकाणी प्रेक्षकांना तिकिट मिळत नाहीये. तिकिटसाठी फॅन्स अधिक पैसे देखील देण्यासाठी तयार आहेत. राजस्थानमध्येदेखील अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. अशीच घटना कोटामध्ये घडली आहे. कोटामध्ये थिएटरगृह हाऊसफुल झाले होते. तरीही तिकिट विकले गेले आणि आत सीट न मिळाल्याने प्रेक्षकांनी मोठा गोंधळ घातला. चित्रपटगृहात बसायला जागा न मिळाल्याने लोकांनी तोडफोड केली. (Pathaan Full Shows)

प्रेक्षकांना आतमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे लोकांनी गदारोळ घातला. हे पाहून सिनेमाहॉल आणि कँटीनचे कर्मचारी पळू लागले. लोकांचं म्हणणं होतं की, तिकिट खरेदी केल्यानंतर हॉलमध्ये बसायला जागा मिळाली नाही. गदारोळ पाहून सिनेमा संचालकने अनेक प्रेक्षकांचे पैसे परत केले.

किंग शाहरूख खानने ४ वर्षांनतर पठाण चित्रपटाद्वारे पडद्यावर पदार्पण केल्याने चाहता वर्ग सुखावला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बायकॉट पठाण ट्रेंड सुरू झाल्याने ‘पठान’ला ग्रहण लागणार की काय? असं वाटतं होतं. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोनच दिवसांत दमदार ओपनिंग करत १०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

शाहरूख खान आणि दीपिका पदुकोनचा पठान चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटातील गाण्यांसह अनेक कारणामुळे वादग्रस्त ठरलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल की नाही, अशी शंका होती. लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली होती. पण कलेक्शन पाहिल्यानंतर हा चित्रपट हिट झाल्याचे दिसले.

पठान हा चित्रपट जगभरात ८ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. भारतात पाच हजार पाचशे स्क्रीन्स आणि परदेशात अडीच हजार स्क्रीन्सवर चित्रपट झळकत आहे. जगभरात या चित्रपटाला पसंती देत चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. शाहरुखच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७० कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत चित्रपटाने ३१ कोटींची कमाई केली होती.

Back to top button