Angry Ranbir : माँ का लाडला बिगड गया! रणबीरने फॅन्सचा फोन दिला फेकून (Video) | पुढारी

Angry Ranbir : माँ का लाडला बिगड गया! रणबीरने फॅन्सचा फोन दिला फेकून (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रणबीर कपूरचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रेमापोटी फॅन्स काय काय करतात. जिथे जिथे हे कलाकार जातात, तिथे फॅन्सची गर्दी जमते. रणबीरच्या बाबतीतही असेच घडले. एका ठिकाणी रणबीर येताच (Angry Ranbir) फॅन्स त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. यादरम्यान, संतापलेल्या रणबीरने एका फॅनचा मोबाईल चक्क फेकून दिला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Angry Ranbir)

व्हायरल व्हिडिओ विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, एक फॅन रणबीरसोबत सेल्फी घ्यायला जातो. रणबीर आनंदाने पोझ देताना दिसतो. तो फॅन पुन्हा सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी संतापलेला रणबीर त्या फॅनच्या हातातून मोबाईल घेतो आणि मागे फेकून देतो. यावेळी रणबीरच्या चेहऱ्यावर राग दिसतो. रणबीरच्या या प्रकारामुळे नेटिझन्स मात्र नाराज आहेत.

काही युजर्स म्हणत आहेत की, रणबीरचा हा व्हिडिओ एका जाहिरातीचा आहे. याचा पुढील भाग येणे अद्याप बाकी आहे. तर काही जण म्हणतात की, ‘हा, आणखी व्हा त्याचे फॅन्स’. दुसरा युजर म्हणतो की-‘असं काय घडलं?’

आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर रणबीर कपूर श्रद्धा कपूरसोबत ‘तू झूठी मैं मक्कार’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडीने भरपूर आहे. ८ मार्च, २०२३ रोजी चित्रपट रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button