ऑस्ट्रेलियात सापडला फुटबॉलएवढा बेडूक | पुढारी

ऑस्ट्रेलियात सापडला फुटबॉलएवढा बेडूक

कॅनबेरा : तलावाच्या कडेला बघितलेल्या बैलाचे वर्णन आपल्या आईला सांगताना अंग फुगवणाऱ्या बेडकाची गोष्ट आपण सर्वांनीच कधी ना कधी ऐकली असेल; पण ऑस्ट्रेलियात खरोखरच जगातला सर्वात मोठा बेडूक सापडला आहे. हा बेडूक बैलाएवढा मोठा नसला, तरी फुटबॉलच्या आकाराचा असून, त्याचे वजन २ किलो ७०० ग्रॅम आहे. सर्वसामान्य बेडकापेक्षा तो ६ पट मोठा आहे. वन्यजीव संशोधकांना इतका मोठा बेडूक सापडेल, असा अंदाजही नव्हता.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात पार्क रेंजर काईली ग्रे हिला सर्वप्रथम हा बेडूक दिसला. खरे तर सर्वसामान्य बेडकासारखाही हा जीव नाही, तर तो टॉड नामक प्रकारातील जीव आहे. त्यांनी या बेडकाचे नाव टॉडझीला असे ठेवले आहे. गिनीज बुक रेकॉर्डनुसार या पूर्वी अशाप्रकारचा वजनदार बेडूक १९९१ मध्ये स्विडनमध्ये सापडला असून, त्याचे वजन २ किलो ६५ ग्रॅम होते.

Back to top button