Surjeet Singh Rathore : मॉडेलचा छळ, छेडछाडप्रकरणी करणी सेनेच्या नेत्याला अटक

Surjeet Singh Rathore
Surjeet Singh Rathore
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : करणी सेनेचा नेता सुरजीत सिंह राठौरवर (Surjeet Singh Rathore) एका मॉडलने छेडछाड आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुरजीत सिंह विरोधात मॉडलने गंभीर आरोप करत मुंबईतील बांगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सुरजीत सिंहला अटक केलीय. (Surjeet Singh Rathore)

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, करणी सेनेचा नेता सुरजीत सिंह राठौरला एका मॉडलच्या तक्रारीनंतर अटक केलीय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सुरजीत सिंह राठौर चित्रपट जगताशीही संबंधित आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तो खूप चर्चेत होता. सुरजीत सिंहने दावा केला होता की, १५ जून, २०२० रोजी रिया चक्रवर्तीला कपूर हॉस्पिटलमधील शवागृहात घेऊन गेला होता, जिथे पोस्टमार्टमनंतर सुशांतचा मृतदेह ठेवण्यात आला होता. सुरजीत सिंह राठौरने सांगितलं होतं की, सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज सिंह बबलू त्याच्या ओळखीचे असून जवळचे आहेत. त्याचसोबत त्याने सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि निर्माता संदीप सिंहवरदेखील अनेक गंभीर आरोप केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news