Ved Movie Actress: रितेश देशमुखसोबत दिसणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?

जिया शंकर - रितेश देशमुख
जिया शंकर - रितेश देशमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'वेड' (Ved Movie Actress)या मराठी चित्रपटामध्ये जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्यासोबत दिसणारी महत्त्वाच्या भूमिकेतील जिया शंकर ही अभिनेत्री कोण आहे, तुम्हाला माहिती आहे का? साऊथ अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar ) हिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अनेक हिंदी मालिकेतही दिसली होती. (Ved Movie Actress)

कोण आहे वेड चित्रपटातील जिया शंकर?

जियाने वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिचा जन्म मुंबईमद्ये १७ एप्रिल, १९९५ रोजी झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने २०१३ मध्ये entha andanga unave या तेलुगू चित्रपटातून केली. जियासोबत Ajay आणि Gundu Hanumantha Rao हे साऊथ कलाकारही दिसले होते. तिने काही तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे.

२०१४ मध्ये लव्ह बाय चान्स सीझनमध्ये ती दिसली होती. यामध्ये शिवांगी जोशी, बरखा सिंह, कवि शास्त्रीदेखील होते.२०१५ मध्ये क्वीन है हम या मालिकेत दिसली.

२०२२ मध्ये पिशाचिनी या मालिकेतती मुख्य भूमिकेत होती. यामध्ये तिची पवित्रा ही भूमिका होती. हर्ष राजपूतची भूमिकाही यामध्ये होती.
'मेरी हानिकारक बीवी' ही तिची हिंदी मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत तिची डॉक्टरची भूमिका होती. ती या मालिकेत आरोग्याबाबत खूप जागृत असलेली दिसते.

रिअल लाईफमध्येही फिटनेस फ्रिक जिया

रिअल लाईफमध्ये जिया स्वत:ला फिट ठेवते. ती डाएट पॅटर्न फॉलो करते. खास एक्सरसाईज करते. ती एक्सरसाईज करताना कोणताही ब्रेक घेत नही. ती स्ट्रेचिंग एक्सरसाईज, डान्स एक्सरसाईज नियमितपणे करते. ५ ते ७ मिनिटांमध्येही ती एक्सरसाईज करू शकते. यामुळे ती दिवसभर फ्रेश राहते.

प्रॉपर डाएट

आपल्या डाएटमध्ये सॅलड, हिरव्या भाज्या, प्रोटिन, ग्रीन टी, ज्यूसचा समावेश असतो. ती ब्रेड, मैद्याचे पदार्थ खात नाही. ती खूप पाणी पिते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होत नाही.

कमीत कमी मेकअप

स्क्रीनवर तिला नेहमी हेवी मेकअप करावा लागतो. पण, घरी ती नेहमी लाईट मेकअप करते. केवळ मस्कारा आणि लिपस्टिक लावते.

जिया शंकरचे चित्रपट – Ved, Entha Andanga Unnave, Kanavu Variyam, Hyderabad Love Story

जिया शंकरच्या मालिका – मेरी हानिकारक बीवी, क्वीन्स है हम, पिशाचिनी

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news