पुढारी ऑनलाईन डेस्क : गोल्डन ग्लोब अवॉर्डनंतर एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. 'RRR'ला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट म्हणून २८ व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स (28th Critics Choice Awards) मिळाला आहे. तसेच या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे बेस्ट साँग ठरले आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला लॉस एंजेलिस येथे झालेल्या समारंभात सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड मिळाला आहे. याबाबत क्रिटिक्स चॉइस अवॉर्डच्या ट्विटर हँडलने एक पोस्ट शेअर केली आहे की, "@RRRMovie च्या कलाकार आणि क्रूचे अभिनंदन. असे हे ट्विट आहे.
'बाहुबली'नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'आरआरआर' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. या चित्रपटाने देश-विदेशात बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे. 'आरआरआर' मध्ये रामायण-महाभारताचा संदर्भ वापरण्यात आला आहे. ज्यु. एनटीआर, रामचरण तेजा, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका त्यात आहेत. हे गाणे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे आणि कला भैरवी आणि राहुल सिपलीगुंज यांनी लिहिले आहे.
2017 च्या ब्लॉकबस्टर 'बाहुबली 2: द कन्क्लुजन' नंतरचा राजामौलीचा यांचा हा पहिला प्रकल्प होता, जो गेल्या वर्षी जगभरात एकाच वेळी हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये रिलीज झाला होता. अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. (28th Critics Choice Awards)
हेही वाचा