Pathan Movie : ‘पठाण’चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने शाहरुख, दीपिका बाबत केला मोठा खुलासा

Pathan Movie : ‘पठाण’चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने शाहरुख, दीपिका बाबत केला मोठा खुलासा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन यांच्या पठाण (Pathan Movie)  या बहुचर्चित चित्रपटाला घेऊन नवे नवे खुलासे आणि वाद वाढतच आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच वादाचा भोवऱ्यात अडकला आहे. समाज माध्यमांवरुन आतापासूनच बॉयकॉटचा नारा दिला जात आहे. चित्रपटाचे टिझर, गाणे या सर्वांवरच एका वर्गाकडून या चित्रपटासह चित्रपटातील कलाकरांवर टीका केली जात आहे. या सगळ्या घडामोडीत चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोनला घेऊन मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट यशराज फिल्म्सचा अप्रतिम अॅक्शन शो आहे. चित्रपटाच्या ट्रेलरबाबत होणाऱ्या चर्चेनंतर आता सिद्धार्थ आनंदने चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. 'पठाण' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटासोबतच त्याची गाणीही तेव्हापासून चर्चेत आहेत. दरम्यान, ट्रेलरनंतर आता सिद्धार्थ आनंदने सोशल मीडियावर 'पठाण' चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे. YRF ने आज रिलीज केलेल्या रॅपिड फायर व्हिडिओमध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने 'पठाण' चित्रपटाविषयी अनेक रहस्ये उघड केली आहेत! (Pathan Movie)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

सिद्धार्थने सांगितले की, शाहरुख आणि दीपिका चित्रपटात स्फोटक अॅक्शन दाखवण्यासाठी 'जुजुत्सू' शिकले आहेत. जो एक घातक जपानी मार्शल आर्ट प्रकार आहे. YRF चा 'पठाण' चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटातील दोन गाणी – 'बेशरम रंग' आणि 'झूम जो पठाण' – आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे! (Pathan Movie)

'पठाण'च्या ट्रेलरबाबत सिद्धार्थचा खुलासा

सिद्धार्थ आनंद पुढे म्हणाला, 'प्रेक्षकांना ज्या झलकचा आनंद घेता येईल, अशा झलक दाखवण्यासाठी आम्ही ट्रेलरमध्ये अत्यंत सावध आणि धोरणात्मक प्रयत्न केले आहेत. परंतु, त्यांना खर्‍या अर्थाने अॅक्शन फिल्म असणाऱ्या खास दृश्यांचा अंदाजही येऊ दिला नाही. मला आनंद आहे की ट्रेलरमध्ये चित्रपटापेक्षा जास्त काही न दाखवता आम्ही असा ट्रेलर बनवला, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चाहत्यांना 'पठाण'चा अभिमान वाटेल

दिग्दर्शक पुढे म्हणाला की 'हा फक्त एक ट्रेलर आहे'. 'पठाण' कोणत्या स्केलवर बनला आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. मला आशा आहे की आम्ही जगभरातील भारतीयांचे मनोरंजन करू, त्यांना अभिमान वाटेल की आम्ही असा चित्रपट बनवला आहे, जो कोणत्याही आंतरराष्ट्रीय अॅक्शन चित्रपटापेक्षा कमी नाही. हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news