Gandhi Godse Trailer: 'गांधी गोडसे- एक युद्ध' ट्रेलर रिलीज (video) | पुढारी

Gandhi Godse Trailer: 'गांधी गोडसे- एक युद्ध' ट्रेलर रिलीज (video)

पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध चित्रपट दिग्‍दर्शक आणि निर्माते राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi)  तब्बल ९ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. या वेळी ते ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ (Gandhi Godse Trailer) हा  चित्रपट घेवून येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Gandhi Godse Trailer)

‘गांधी गोडसे- एक युद्ध’ च्‍या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अखेर असं काय झालं की, नाथूराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, दोन गट आपसात भिडले आहेत. चारीकडे केवळ हिंसाचार आणि गोंधळ उडालाय. दुसरीकडे महात्मा गांधी अहिंसेने संपूर्ण प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, देशातील अनेक लोक त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत.

वेगळी आहे Gandhi Godse Ek Yudh ची कहाणी

आजपर्यंत मोठ्या पडद्यावर जितकी कहाणी दाखवण्यात आलीय, त्यामध्ये महात्मा गांधींजींचे विचार सादर करण्यात आले आहेत. यावेळी नाथूराम गोडसेच्या विपरीत विचारधारादेखील दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, जेव्हा जेलमध्ये बंद नाथूराम गोडसेला भेटायला गांधी जातात. तेव्हा दोघांचे विचार आमने-सामने उभे असलेले दिसतात.

२६ जानेवारीला रिलीज होणार Gandhi Godse- Ek Yudh

‘गांधी गोडसे- एक युद्ध’ या महिन्यात २६ तारखेला रिलीज होण्यास सज्ज आहे. चित्रपटाची कहाणी असगर वजाहत आणि राजकुमार संतोषी यांची आहे. निर्माती मनीला संतोषी असून महात्मा गांधी यांची भूमिका गुजराती चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते दीपक अंतानी यांनी साकारले आहे. चिन्मय मांडलेकर याने नाथूराम गोडसेची भूमिका साकारलीय.

हेही वाचा : 

Back to top button