Golden Globe Award : एस. एस. राजामौलींच्या ‘RRR’ने इतिहास घडवला, ‘नाटू नाटू’ गाण्याची गोल्डन ग्लोब पुरस्कारावर मोहर

Critics Choice Awards
Critics Choice Awards
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने इतिहास घडवला आहे. या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) मिळाला आहे. 'बाहुबली'नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'आरआरआर' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. या चित्रपटाने देश-विदेशात बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे. 'आरआरआर' मध्ये रामायण-महाभारताचा संदर्भ वापरण्यात आला आहे. ज्यु. एनटीआर, रामचरण तेजा, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका त्यात आहेत. (Golden Globe Awards 2023)

Golden Globe Award : 'नाटू नाटू'

हे गाणे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे आणि कला भैरवी आणि राहुल सिपलीगुंज यांनी लिहिले आहे. 2023 गोल्डन ग्लोब्समध्ये पुरस्कार स्वीकारताना, कीरावानीने त्यांच्या टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि गाण्यावरील त्यांच्या कामगिरीबद्दल एन.टी. रामाराव जूनियर आणि राम चरण यांचे आभार मानले.

पुरस्कारानंतर  'RRR' च्या अधिकृत ट्विटर हँडलने ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांचे ट्रॉफी हातात घेतलेले छायाचित्र शेअर करून त्याचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिलं आहे की, "महापुरुष कीरावानी!!" 2017 च्या ब्लॉकबस्टर 'बाहुबली 2: द कन्क्लुजन' नंतरचा राजामौलीचा यांचा हा पहिला प्रकल्प होता, जो या वर्षाच्या सुरुवातीला जगभरात एकाच वेळी हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये रिलीज झाला होता. अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. (ANI)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news