IND vs SL ODI Series : रोहित शर्मा, विराट कोहली गुवाहाटीत दाखल | पुढारी

IND vs SL ODI Series : रोहित शर्मा, विराट कोहली गुवाहाटीत दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला मंगळवारी (१० जानेवारी) सुरुवात होणार आहे. या वर्षी वनडे विश्वचषक देखील खेळवला जाणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरूवातीला खेळवली जाणारी श्रीलंकेविरोधातील ही मालिका महत्वपूर्ण मानली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू गुवाहाटीत दाखल झाले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

टी 20 मालिकेत दिमाखदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा जखमी झाल्याने टी 20 मालिकेत हार्दिक पंड्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात रोहित शर्मा पुनरागमन करणार आहे.

वनडे मालिकेत विराट कोहली, मोहम्मद शमी आणि के.एल.राहुल यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू देखील खेळताना दिसणार आहेत. वरिष्ठ खेळाडूंबरोबरच भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार आहे. जखमी झाल्याने बुमराहला टी 20 विश्वचषकाला मुकावे लागले होते. (IND vs SL ODI Series)

कोणाचे पारडे जड?

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आत्तपर्यंत १६२ आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ९३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर ५७ सामन्यांमध्ये भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. १ सामना बरोबरीत सुटला तर उर्वरित ११ सामने अनिर्णयीत राहिले आहेत. (IND vs SL ODI Series)

असे असेल वनडे मालिकेचे शेड्युल्ड

मालिकेतील पहिला सामना १० जानेवारीला गुवाहाटीत खेळवण्यात येईल. त्यानंतर दुसरा सामना कोलकताच्या ईडन गार्डनवर १२ जानेवारीला खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १४ जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाईल. मालिकेतील तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होतील. (IND vs SL ODI Series)

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि जसप्रीत बुमराह (IND vs SL ODI Series)

वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ :

दासुन शनाका (कर्णधार), नुवानिडू फर्नांडो, आविष्का फर्नांडो, अशेन बंडारा, पथुम निसंका, धनंजय डिसिल्वा, चरित असलंका, चामिका करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा (यष्टीरक्षक), दिलशान मधुशंका, प्रमोद मदुशन, डुनिथ वेलालेज, जेफरी वेंडरसे, कासुन राजीथा, लाहिरू कुमारा आणि महिष तीक्ष्णा (IND vs SL ODI Series)

हेही वाचलंत का?

Back to top button