Jeremy Renner : हिमवृष्टीच्‍या तडाख्‍यात ‘मार्वल’ स्टार जखमी, रुग्णालयातील फोटो व्हायरल | पुढारी

Jeremy Renner : हिमवृष्टीच्‍या तडाख्‍यात 'मार्वल' स्टार जखमी, रुग्णालयातील फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड स्टार जेरेमी रेनर हिमवृष्टीच्या (snow plow) दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तो रुग्णालयात बेडवर झोपलेली दिसतो. तो ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेत आहे.  (Jeremy Renner ) तो कॅमेराकडे डोळे उघडून पाहत असल्याचे फोटोत दिसत आहे. (Jeremy Renner )

स्नो प्लेविंगच्या दुर्घटना जेरेमी गंभीर जखमी झाला होता. मीडिया रिपोर्टनुासर, रेनरकडे वाशो काउंटी, नेवादामध्ये (washoe county nevada) अनेक वर्षांपासून एक घर आहे. उत्तर नेवादातील काही भाग मागील वर्षीदेखील हिमवृष्‍टीमुळे झाकोळला गेला होता. या नैसर्गिक आपत्तीत अडकल्यानंतर जेरेमीला एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दोनवेळा ऑस्कर नामांकन मिळालेल्या रेनरने चित्रपट थॉरनंतर मार्वल सीरीजमध्ये (Avengers and Captain America) अभिनय केला आहे. रेनरला २०१० मध्ये ‘द हार्ट लॉकर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठीचे ऑस्कर नामांकन मिळाले आहे. २०११ मध्ये ‘द टाऊन’साठी सहाय्यक अभिनेता म्हणून ऑस्कर नामांकन मिळाले आहे.

रेनरने शेरिडनच्या २०१७ चे नाटक विंड रिवरमध्ये अभिनय केला होता. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ज्या प्रदेशात त्याचे घर आहे. त्या प्रदेशात जोरदार हिमवृष्टी झाली होती. ज्यामुळे वाशो आणि इतर काउन्टींमधील ३५ हजारहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jeremy Renner (@jeremyrenner)

Back to top button