

पुढारी ऑनलाई डेस्क : भारत-श्रीलंका टी-२० मालिकेतील दुसर्या सामन्यात अक्षर पटेलची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने ३१ चेंडूमध्ये ६५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या धडाकेबाज खेळीचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर याने अक्षर पटेलबाबत मोठे विधान केले आहे. (Akshar Patel replaces Jadeja )
श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ५७ धावांमध्ये भारताने ५ विकेट्स गमावल्या होत्या. अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवबरोबर केलेल्या खेळीने सामना भारताकडे झुकविण्याचा प्रयत्न केला. अक्षर (६५) आणि सूर्यकुमार यादव (५१) च्या भागिदारीने भारताने सामन्यात पुनरागमन केले. मात्र अखेरच्या षटकात भारताला १६ धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने हा सामना गमावला असला तरीही अक्षरच्या झूंझार फलंदाजीचा आनंद क्रिकेटप्रेमींनी लुटला. (Akshar Patel replaces Jadeja)
भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया चषकादरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आलेले नाही. दरम्यान, अक्षरच्या कामगिरीचे चाहत्यांकडून आणि माजी खेळाडूंकडून कौतुक होत आहे. भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर यांनी म्हटले आहे की, अक्षर अशाच प्रकारे कामगिरी करत राहिला तर तो टीम इंडियात रवींद्र जडेजा याची जागा सहजपणे घेऊ शकतो. जाफर म्हणाला, भारताला जडेजाची कमी जाणवते. तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करतो. मात्र, अक्षर पटेल भारतीय संघात आल्यापासून आपण जडेजाबाबत चर्चा केलेली नाही. अक्षरने त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. (Akshar Patel replaces Jadeja)