Project K: दीपिकाचा न पाहिलेला अवतार, प्रभासचा 'सालार' यादिवशी होणार रिलीज | पुढारी

Project K: दीपिकाचा न पाहिलेला अवतार, प्रभासचा 'सालार' यादिवशी होणार रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम ‘प्रोजेक्ट के’ने एका पोस्टरसोबत दीपिका पादुकोणचा लुक शेअर केला आहे. (Project K) तिच्या वाढदिवसादिवशी दीपिकाला शुभेच्छाही दिल्या जात आहेत. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत दीपिकादेखील आहे. दुसरीकडे प्रभासच्या ‘सालार’ची रिलीज डेटदेखील समोर आलीय. (Project K)

दीपिकाचा ‘प्रोजेक्ट के’ मध्ये न पाहिलेला अवतार

दीपिका पादुकोणच्या वाढदिवसाला तिचे फॅन्स तिला वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, दीपिकाला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासकडून सर्वात चांगले गिफ्ट मिळाले आहे. दीपिकाच्या ‘पठान’ चित्रपटातून तिचे एक नवं पोस्टर पाहायला मिळाले. तसेच आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ मधून तिचा लूकदेखाल पाहायला मिळाला. आधी शाहरुख खानने दीपिकाचा ‘पठान’ लूक शेअर केला. नंतर प्रभासने ‘प्रोजेक्ट के’मधून तिचा लूक शेअर केला आहे. दुसरीकडे, प्रभासच्या चित्रपट ‘सालार’ची रिलीज डेटदेखील समोर आलीय.

‘प्रोजेक्ट के’मधून दीपिकाचा लूक व्हायरल

अमिताभ बच्चन आणि प्रभासच्या या चित्रपटातून दीपिकाचा लुक समोर आला आहे. हा चित्रपट हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक आहे.

दीपिकाच्या वाढदिवसाला पोस्टर रिलीज

चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस वैजयंती मुव्हीजने इन्स्टाग्रामवर ‘प्रोजेक्ट के’चे पोस्टर शेअर करत लिहिले- ‘आमच्या @deepikapadukone ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’ पोस्टरवर ‘ए होप इन द डार्क’ लिहिलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट पुन्हा शेअर करत दीपिकाच्या ‘प्रोजेक्ट के’ ला तिचा सहकलाकार प्रभासनेदेखील शुभेच्छा दिल्या आहेत आणि लिहिलंय, ‘सुपर ऑसम आणि प्रतिभाशाली दीपिका पादुकोणला एक शानदार वाढदिवसाच्या आणि यशाने भरलल्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)

प्रोजेक्ट के जो तेलुगु आणि हिंदी भाषेत एकत्र शूट करण्यात आला आहे. ही दीपिकाची तेलुगु चित्रपटाची सुरुवात असूनप्रभाससोबत त्यांचा पहिला चित्रपट देखील आहे.

या दिवशी रिलीज होणार ‘सालार’

प्रभासचा आगामी ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट ‘सालार’ (Salaar) २८ सप्टेंबर, २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

Back to top button