Tamannaah Bhatia : तमन्ना आणि विजय वर्मा रिलेशनशीपमध्ये?; नव्या वर्षात रोमँटिक मूडमध्ये | पुढारी

Tamannaah Bhatia : तमन्ना आणि विजय वर्मा रिलेशनशीपमध्ये?; नव्या वर्षात रोमँटिक मूडमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या रिलेशनशीपच्या चर्चां गेल्या काही दिवसापासून रंगल्या आहेत. हे कपल रेस्टॉरंट असो वा डिनर डेट अनेक ठिकाणी स्फॉटदेखील होत आहे. याच दरम्यान तमन्ना आणि विजय याच्या आणखी एका नववर्षाच्या व्हिडिओनं त्याच्यातील नात्याचा खुलासा झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

यंदाच्या नववर्षाच्या स्वागतासाठी तमन्ना (Tamannaah Bhatia) आणि विजय हे दोघेजण गोव्याला पोहोचले होते. यावेळी दोघांनी पार्टीत धमाकेदार परफार्मवर डान्स करत नववर्षाचा आनंद लूटला. यात खास करून रोमँटिक विजयने पार्टीत तमन्नाला पहिल्यांदा हग आणि त्यानंतर किस केले. यामुळे त्याच्यातील रिलेशनशीपच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. परंतु, या कपलने त्याच्या नात्याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा चाहत्यांच्यात पसरली आहे. याआधी २१ डिसेंबर रोजी अभिनेत्रीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दोघेजण एकत्रित स्पॉट झाले होते.

तमन्ना आणि विजय यांच्या वक्रफंटबद्दल बोलायचे झाल्यास तर, तमन्ना नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोल चुडिया’ चित्रपटात दिसणार आहे. तर विजय हा लवकरच आगामी ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

Back to top button