Screw Dheela : रश्मिकाला डच्चू; टायगरसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स!

Screw Dheela
Screw Dheela

पुढारी ऑनलाईन डेस्क : धर्मा प्रोडक्शनने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा आगामी 'स्क्रू ढीला' (Screw Dheela) चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर मध्यंतरी टायगरचा हा चित्रपट बंद करण्याचे वृत्त समोर आले आणि चाहत्य़ाची प्रचंड निराशा झाली. या चित्रपटात टायगरसोबत 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करणार होती. परंतु, सध्या एक नवीन खुलासा समोर आला आहे. रश्मिकाला या चित्रपटातून निर्मात्यांनी डच्चू दिला असून त्या जागी नव्या अभिनेत्रींची एन्ट्री करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगरचा आगामी 'स्क्रू ढीला' ( Screw Dheela ) चित्रपट बंद करण्यात आलेला नाही. तर निर्माते शशांक खैतान हे चित्रपटाच्या स्क्रिप्टवर जोरदार काम करत आहेत आणि लवकरच चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार आहे. 'स्क्रू ढीला' चित्रपटात टायगरसोबत अभिनेत्री रश्मिका मंदानाची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळणार होती. परंतु, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, टायगरसोबत शनाया कपूर रोमान्स करणार आहे. धर्मा प्रोडक्शन बॅनरखाली शनाया कपूर पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शनाया कपूरला एन्ट्री तर रश्मिका मंदाना डच्चू

'स्क्रू ढीला' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती तेव्हा रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार अशी माहिती समोर आली होती. यामुळे टायगरसोबत रश्मिकाची जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक होते. परंतु, तिच्या जागी दुस-या अभिनेत्रीला घेतल्याने आता चाहत्याची निराशा झाली आहे. रश्मिकाला चित्रपटातून डच्चू देऊन त्या जागी अभिनेत्री शनाया कपूरला रिप्लेस केलं आहे. रश्मिकाला या चित्रपटातून का बाहेर काढले गेले? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news