Tunisha Sharma : तुनिषाने शीझानच्या आईला केलेल्या कॉलची ऑडिओ क्लिप व्हायरल

तुनिषा शर्मा केस
तुनिषा शर्मा केस

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) ची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तुनिषाने मृत्यूपूर्वी शीझानच्या आईला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकार परिषदेत शीझानच्या बहिणींनी ही ऑडिओ क्लिप सर्वांना ऐकवली. यावेळी शीझान खानच्या परिवाराकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत शीझान खानची आई, वकील आणि शीझानच्या दोन बहिणी फलक नाज (Falaq Naaz) आणि शफक नाज उपस्थित होत्या. (Tunisha Sharma)

सोमवार सकाळी ११ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत शीझान खानच्या परिवाराने तुनिषाच्या आईवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकचं नाही तर फलक नाजने माध्यमांसमोर तुनिषाची एक तथाकथित रेकॉर्डिंगदेखील ऐकवली. या रेकॉर्डिंगमध्ये तुनिषा रडत शीझानच्या आईला म्हणते की, ' अम्मा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात. खूप अधिक…मी तुम्हाला जास्त ओ‍ळखत नाही. पण तरीही तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करावीशी वाटते. माझ्या मनात जे काही आहे, ती मी सांगेन. पण माहित नाही…माहित नाही की, मला स्वत:ला काय होत आहे.'

फलक नाजने सांगितलं की, हा ऑडिओ सप्टेंबरचा आहे. त्यादिवशी तुनिषाच्या आईचा वाढदिवस होता. तिच्या आईने संजीव कौशलसोबत वाढदिवस साजरा केला होता. हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ऑडिओ ऐकल्यानंतर एका युजरने लिहिलं, 'तिच्या आवाजातील दु:खाने माझं मन मोडत आहे. तुनिषाच्या आत्म्याला शांती मिळो'. दुसऱ्या युजरने लिहिलं, 'मला वाटतं की, हा ऑडिओ फेक आहे.' तिसऱ्या युजरने लिहिलं, 'हे एडिट केलेलं आहे, हे स्पष्ट कळतं.' आणखी एका युजरने लिहिलं की, 'जर त्यांच्या मनात आधीपासून काही नाही तर मग त्यांनी कॉल रेकॉर्ड का केलं.'

फलक नाज म्हणाली, तुनिषाचे हे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर वनीता शर्मा तिच्यावर दबाव आणायची. त्यांना स्वत:ला अभिनेत्री व्हायचं होतं आणि मग आपल्या मुलीलादेखील जबरदस्तीने अभिनय क्षेत्रात घातलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news