अशी ही बनवाबनवी : धनंजय माने इथेचं राहतात का? चा किस्सा माहितीये का?

अशी ही बनवाबनवी चित्रपटातील दृश्‍य.
अशी ही बनवाबनवी चित्रपटातील दृश्‍य.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अशी ही बनवाबनवी हा सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेला एक लोकप्रिय मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रसृष्टीत विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील अशी ही बनवाबनवी हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट आहे.  अजूनही रसिकांमध्ये जबरदस्त लोकप्रिय आहे.

२३ सप्टेंबर १९८८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज ३३ वर्षे झाली आहेत. जेव्हा केंव्हा अशी ही बनवाबनवी चित्रपट टीव्ही वाहिनीवर लागतो तेव्हा आपोआपच प्रेक्षक रिमोट बाजूला ठेवतो. आणि 'आमच्या शेजारी राहते. नवऱ्याने टाकलंय तिला…', 'सारखं सारखं एकाच झाडावर काय?', 'सत्तर रुपये वारले' असे विनोदी संवाद ऐकून पोट धरून हसतो. अशा संवादापैकी एक डायलॉग म्हणजे धनंजय माने इथेचं राहतात का?

या चित्रपटाचा माेठा फॅन फॉलोअरही आहे. यातले डायलॉग पाठ असणारे तर खासमखासच आहेत. 'अशी ही बनवाबनवी'चे दोन चाहते भेटले आणि त्यांच्यात या चित्रपटाविषयी चर्चा रंगली म्हणजे आहाहा… पर्वणीच. नुसत दंगाच… एकमेकांना किस्से किस्सेच सांगत बसतात. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर अशी एकापेक्षा एक तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. यासगळ्यांनी मिळून अक्षरक्ष: धुमाकुळ घातला आहे.

'धनंजय माने इथेच रहातात का?'… हा डायलॉग माहिती आहे का? आता यातील धनंजयची भूमिका साकारली आहे ती अशोक सराफ यांनी. पण चित्रपटातल्या या धनंजयला 'माने' हे आडनाव कसं मिळालं? चित्रपटाचे पटकथा लेखक वसंत सबनीस यांना हे नाव कसं सुचलं? या मागची रंजक माहिती उपलब्ध करून दिली होती- प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी. आता किरण माने यांनी 'मुलगी  झाली हो' मालिकेतील 'विलास पाटील' यांची भूमिका साकारलीय. या अभिनेत्यानं त्याच्या फेसबुकवर अकाऊंटवर याबाबत एक खासच लघुलेख लिहिला होता.

किरण माने फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले होते…. 

'खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही… पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची गरज आहे." त्याला कुठलं आडनांव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर – वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते… बरीच आडनांवं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं…

एवढ्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, "या या माने.. काय काम काढलंत?"  व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते.

त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. 'त्या' हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तोवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव 'माने' हेच असेल !!!

मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारलं की "माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या 'धनंजय' या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?" केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला…

…आणि संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो 'अजरामर' डायलाॅग जन्माला आला.

तो डायलाॅग म्हणजे 'धनंजय माने इथेचं राहतात का?'

'धनंजय माने इथेच रहातात का?'

किसन माने यांचे चिरंजीव विक्रम माने माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत… त्यांनी एक दिवस इनबाॅक्स मध्ये ठकठक केलं "किरण माने इथंच रहातात का?" …आणि मला ही घटना सांगितली. लै भारी वाटलं… म्हन्लं, मी हा किस्सा फेसबुकवरून दोस्तलोकांना सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? नाही तर पुन्हा म्हणाल, 'हा शुद्ध हलकटपणा आहे माने!'

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news