The Legend of Maula Jatt : मनसेच्या विरोधानंतर पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’चे प्रदर्शन रद्द | पुढारी

The Legend of Maula Jatt : मनसेच्या विरोधानंतर पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’चे प्रदर्शन रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ आता भारतात प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट आज ३० डिसेंबरला भारतात रिलीज केला जाणार होता. पण, मनसेच्या विरोधानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चित्रपटगृह मालकांना चित्रपट रिलीज न करण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानी चित्रपट द लीजेंड ऑफ मौला जट्ट ( The Legend of Maula Jatt) पहिला असा पंजाबी भाषेतील चित्रपट आहे, ज्याने आतापर्यंत जगभरात २०० कोटींचा बिझनेस केला आहे.

भारतात ३० डिसेंबरला रिलीज होणार होता चित्रपट

रिपोर्टनुसार, पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’साठी आता कुठलीही नवी तारीख समोर आलेली नाही. हा चित्रपट अनिश्चित काळासाठी बॅन करण्यात आला आहे. यासोबतचं सेन्सॉर बोर्डानेदेखील सर्टिफिकेट रद्द केलं आहे. मनसेसह अनेक संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असा पवित्रा मनसेने घेतला होता. आता मनसेने या पाकिस्तानी चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन रद्द करून दाखवले.

फवाद खान स्टारर द लेजेंड ऑफ मौला जट्ट हा चित्रपट पाकिस्तानचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी जगभरात रिलीज करण्यात आला होता. आतापर्यंत या चित्रपटाने २०० कोटींचा बिझनेस केला आहे. चित्रपटामध्ये फवाद खान, माहिरा खान, हुमैमा मलिक आणि हमजा अब्बासी यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ( The Legend of Maula Jatt)

हेही वाचलंत का? 

Back to top button