Salman Khan : सलमानच्या एका झलकसाठी तुफान गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीमार(Video)

 salman khan with fans
salman khan with fans
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानच्या ५७ व्या वाढदिवसाला अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स तासनतास उभे होते. (Salman Khan) फॅन्सनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तुफान गर्दी केली होती. तमाम सुरक्षा असताना देखील इतकी गर्दी झाली की, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. (Salman Khan)

सलमान खानच्या ५७ व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन धमाकेदार ठरलं. जेव्हा अभिनेत्याने २६ डिसेंबर रोजी सायंकाळी मित्र आणि चित्रपट इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी पार्टी ठेवली होती. त्याचवेळी फॅन्सची अलोट गर्दी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झाली होती. 'भाईजान'ची एक झलक पाहण्याासाठी देशातील कानाकोपऱ्यातून फॅन्स सलमानच्या घराबाहेर जमले होते. इतकी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. पोलिस गर्दीला बॅरिकेड लावून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. सलमान फॅन्सना भेटण्यासाठी घराच्या बाल्कनीत आला तेव्हा गर्दी अनियंत्रित झाली. अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज आणि ट्विट्स व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, सलमान आपले वडील सलीम खान यांच्यासोबत बाल्कनीत येतो. सलमानने फॅन्सना अभिवादन केले आणि नमस्कारदेखील केले. आपल्या नेहमीच्या अंदाजात सॅल्यूटदेखील केलं.

सलमानच्या पार्टीत शाहरुखसह पोहोचले हे सेलेब्स

सलमान खानला फॅन्सनी सोशल मीडियासोबतचं प्रत्यक्षात उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बर्थडे पार्टीत शाहरुख खान, रितेश देशमुख, जेनेलिया, तबु, पुलकित सम्राट, यूलिया वंतूर संगीता बिजलानीदेखील हजर होती.

video-viralbhayani insta वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news