ललित प्रभाकरचा येतोय बेधडक ‘टर्री’

टर्री चित्रपट
टर्री चित्रपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष्यातला असा एक काळ ज्यात प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छा असते. चुकीचं घडताना त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद असते. हाच अंदाज आपल्याला अभिनेता ललित प्रभाकरच्या रूपाने आगामी 'टर्री या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. 'टर्री' हा शब्द पाळणारा, खरी मैत्री जोपासणारा, कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा पण गरम रक्ताच्या 'टर्री' मध्ये हळवेपणा आहे. अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात 'टर्री' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच नव्या अंदाजात दिसणार आहे.

'त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..! त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय…टर्री!!! '. असा जबरदस्त स्वॅग घेऊन 'टर्री' चित्रपटाचं बेधडक रांगडं पोस्टर नुकतचं प्रदर्शित करण्यात आलं आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'ऑन युव्हर स्पॉट आणि फॅन्टासमागोरिया फिल्म्स यांच्या सहयोगाने 'टर्री' चित्रपटाची निर्मिती करण्यात आलीय. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात ललितसोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले आहे. संकलन प्रवीण जहागीरदार, श्रीराम बडवे यांचे आहे. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले यांचे आहे. गायक अवधूत गुप्ते, रोहित राऊत, शरयू दाते यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे ॲक्शन डिरेक्टर आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका करायला मिळाल्याचं ललित आवर्जून सांगतो. वर्षभर या भूमिकेसाठी मी मेहनत घेतली असून चित्रपटातील माझा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास अभिनेता ललित प्रभाकरने व्यक्त केला. हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news