Rupali Bhosle : धारदार नाक हाच तुझा दागिना, गॉगलची काय गरज?

rupali bhosale
rupali bhosale
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' मालिकेतून मराठी अभिनेत्री रूपाली भोसले प्रकाशझोतात आली. या मालिकेत रूपालीने खलनायिका 'संजना' ची भूमिका साकारली आहे. रूपाली नेहमीचं आपले अपडेट चाहत्यांशी शेअर करत असते. सणासंदर्भात असो, कार्यक्रमासंदर्भात असो वा मालिकेसंदर्भात असो ती आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आताही तिने एकापेक्षा एक हॉट फोटोज शेअर केले आहेत. रूपालीच्या ब्ल्यू कलरच्या वनपीसने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Rupali Bhosle)

अभिनेत्री रूपाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्रामवर कलरफूल ब्ल्यू- आकाशी कलरच्या वनपीसमधील फोटो पोस्ट केले आहेत. कुरळ्या मोकळ्या केसांची स्टाईल, डोळ्यावर ब्लॅक गॉगल, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यातील खास म्हणजे, रूपालीने तिच्या ड्रेसवर ब्लॅक कलरचा सुंदर बेल्ट कंबरेवर घातला आहे. यावेळी तिने एका कारच्या शेजारी उभारून आणि स्वत: च्या कमरेवर हात ठेवत एकापेक्षा एक हॉट फोटोला पोझ दिली आहे.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने "God turns you from one feeling to another and teaches by means of opposites so that you will have two wings to fly, not one." ~RuMi ~ आणि 'Do not try to explain. They will only understand you as much as they see and hear. ~ Rumi ~'असे लिहिले आहे.

तिच्या फॅन्सकडून तिला खूप सुंदर कमेंट्स मिळताहेत. फॅन्सनी कमेंट बॉक्समध्ये काय म्हटलं आहे पहा-सोळा वर्षांच्या मुलीला पण लाजवाल इतक्या गोड दिसता तुम्हीं ❤️❤️???, Simply gorgeous ❤️, Miss maharashtra ?, Kitti Nishpap bhav aahet cheheryavar. ?❤️ tari sudha Anirudhala samaj detana lagech bhav badaltat. Pan kahika asena tu ek uttam kalakar aahes. Ani tuze kam aamhala manapasun aavadate. Keep it up. ?, गोगल मुळे नाकाची शोभा जाते. धारदार नाक हाच तुझा दागिना आहे., ❤️ lie Evergreen Color All time Rupa, So beautiful Rupali, Stunning baby ?, I love you sweetheart lovely beautiful darling❤️, Omg….gorgeous lady my fav❤️, Bole toh Ekdum #Jhakaas ?????? So Beautiful ?. खूप साऱ्या फॅन्सनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर फायर आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news