Chalapathi Rao : ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे निधन | पुढारी

Chalapathi Rao : ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे निधन

पुढारी ऑलनाईन डेस्क : ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे निधन अभिनेते चलपती राव ( Chalapathi Rao ) यांचे आज ( दि. २५ ) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्‍याच्‍या मागे मुली व एक मुलगा असा परिवार आहे. रवी बाबू एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे.

चलपती राव यांचा जन्‍म ८ मे १९४४ रोजी आंध्र प्रदेशमधील कृष्‍णा जिल्‍हयात झाला. त्‍यांनी दाक्षिणात्‍य सुपरस्‍टार एन. टी. रामाराव यांच्या प्रोत्साहनाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९६६ मध्‍ये ‘घोडाचारी 116’ हा त्‍यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्‍यांनी मागे वळून पाहिले नाही.

चलपती राव यांनी तेलुगू चित्रपटात कॉमेडी आणि खलनायकाच्‍या भूमिका साकारल्या. ‘साक्षी’, ‘ड्रायव्हर रामुडू’ आणि ‘वजराम’ आणि अभिनेता सलमान खानसोबत त्‍यांनी  ‘किक’ या हिंदी चित्रपटातही काम केलं होते. चलपती राव यांनी सुमारे ६०० हून अधिक चित्रपटात काम केले  होते. त्यांनी एन.टी. रामाराव, कृष्णा, नागार्जुन, चिरंजीवी आणि व्यंकटेश या प्रमुख अभिनेत्यांसोबत सहाय्यक भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली होती.

हेही वाचा :  

Back to top button